बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 26 मे 2020 (07:34 IST)

नागपूर जगातील सर्वांत उष्ण शहरांत आठवा क्रमांकावर

नागपूर – नागपूर जगातील आठवे उष्ण शहर आहे. सोमवारपासून नवतपा सुरू झाला आहे. यामुळे पारा आणखी भडकण्याची दाट शक्यता आहे. तसे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
 
हवामान विभागाने रेड अलर्ट दिल्याने विदर्भात तापमानाची तीव्र लाट येईल अशी शक्यूता वर्तविली जात होती. नागपूरच्या पाऱ्यात वाढ होऊन तापमान 46.7 अंशांवर गेले. नागपूरकरांसाठी यंदाच्या उन्हाळ्यातील हा सर्वांत उष्ण दिवस ठरला. नागपूरचे तापमान विदर्भासह राज्यात सर्वाधिक ठरले. शिवाय देशातही राजस्थानातील चुरूनंतर नागपूर दुसऱ्या क्रमांकाचे उष्ण शहर म्हणून नोंद करण्यात आली. चुरू येथे 47.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
 
मित्रीबाह कुवैत व नवाबशाह पाकिस्ताननंतर चुरू हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले. तशी नोंद जागतिक तापमानाची नोंद ठेवणाऱ्या “एल डोराडो’ या संकेतस्थळावर आहे. मित्रीबाह येथे कमाल तापमान 48.3 अंश सेल्सिअस तर नवाबशाह येथे 48.2 अंश सेल्सिअस नोंदले गेले. जागतिक तापमानात नागपूरचा क्रमांक आठवा राहिला. नागपूरचा सर्वाधिक तापमानाचा विक्रम 47.9 अंश सेल्सिअस इतका आहे. तर विदर्भात चंद्रपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे.